होळीचे रंग तुमची त्वचा केस आणि डोळे यांच्यासाठी त्रासदायक ठरतील जर तुम्ही हे केले नाही

होळीचे रंग तुमची त्वचा केस आणि डोळे यांच्यासाठी त्रासदायक ठरतील जर तुम्ही हे केले नाही

होळी हा भारतातील महत्त्वपूर्ण सण आहे या सणाला आपण आपले मित्र-मैत्रिणी, परिवार, नातेवाईक यांच्यासोबत  रंगाची उधळण करून होळी हा सण साजरा करत असतो.तुम्हाला माहिती आहे का आज ही रंगाची उधळण तुमची त्वचा केस,आणि डोळ्यांवर खूप मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवू शकते कारण सध्या होळी खेळण्यासाठी वापरले जाणारे रंग हे केमिकल युक्त आहेत. यामुळे रंगाची उधळण करून होळी खेळू नये असा नाही तर होळी खेळण्यापूर्वी आणि खेळल्यानंतर काही नियमांचे पालन केल्यास तुमची होळी आनंदात साजरी होऊ शकते.

लक्षपूर्वक वाचा,काय आहेत केमिकल युक्त रंगांचे दुष्परिणाम.

१. तुमच्या त्वचेवर चट्टे पडू शकतात तसेच त्वचा लाल होऊ शकते.
२. त्वचेवर जळजळ जाणवू शकते.
३. त्वचा कोरडी पडू शकते.
४. रंग केसात आणि डोळ्यामध्ये गेल्यास भविष्यात केस आणि डोळ्यांच्या  समस्या निर्माण होऊ शकतात.
५. रंग खेळल्यानंतर हात स्वच्छ न-करता जेवण केल्यास किंवा अन्न पदार्थ खाल्ल्यास हे रंग तुमच्या पोटात जाऊन पोटाच्या समस्या निर्माण होतील.
६. शक्यतो पाच वर्षाखालील लहान मुलांनी होळी खेळू नये तसेच ही मुले रंग खेळत असताना पालकांच्या निरीक्षणाखाली असावीत

जर तुम्हाला या समस्यांना सामोरे जायचे नसेल तर तुम्ही नैसर्गिक तसेच हर्बल  रंगांचा वापर करून होळी खेळू शकता कारण हे रंग तुमची त्वचा केस किंवा डोळ्यांवर शक्यतो कोणता परिणाम करत नाहीत हे रंग सहजासहजी त्वचा ,केस आणि कपड्यांवरून पाण्याचा वापर करून धुऊन काढता येतात तसेच गहू आणि कॉर्न फ्लोअरसह बनविलेले रंग बाजारात उपलब्ध आहेत याचा वापर तुम्ही करू शकता
 

या लोकांनी होळी खेळू नका

१.जर तुम्हाला त्वचा केस आणि डोळ्यांच्या समस्या असतील आणि अशा परिस्थितीत तुम्ही होळी खेळतात तर तुम्हाला एखाद्या मोठ्या सर्जरीला सामोरे जावे लागू शकते.
२.जर तुम्ही त्वचेवर काही ट्रीटमेंट केल्या असतील जसे की वेक्सिंग, थ्रेडिंग तर रंग खेळू नका कारण ट्रीटमेंट नंतर तुमची त्वचा मुलायम झालेली असते त्यामुळे केमिकलयुक्त रंगांचा सगळ्यात जास्त परिणाम तुमच्या त्वचेवर होऊ शकतो

जरा याकडे लक्ष द्या
बाजारातून रंग खरेदी करताना त्या रंगाच्या पॅकेटवर CE-सर्टिफाइड असे लिहिले आहे का हे जरुर पहा आणि नसेल तर हा रंग चुकूनही खरेदी करू नका कारण हा रंग तुमच्या आयुष्याचा बेरंग केल्याशिवाय राहणार नाही

होळी खेळण्यापूर्वी हे अवश्य करा
१. असे कपडे परिधान करा की ज्यामुळे तुमचे संपूर्ण शरीर झाकले जाऊ शकेल.
२. केस झाकून घेण्यासाठी डोक्यावर एखादा रुमाल बांधा.
३. त्वचेवर तेलाने मालिश करा,त्वचेवर तेल लावल्यामुळे रंग जास्त काळ त्वचेवर  राहणार नाहीत.
४. हाताच्या नखांवर नेल पॉलिश करा यामुळे हाताची नखे आणि त्याच्या बाजूची त्वचा सुरक्षित राहील.

होळी खेळल्यानंतर हे अवश्य करा
१. रंग खेळून झाल्यावर त्वरित भरपूर पाण्याने अंघोळ करा आणि शरीरावरील रंग धुऊन काढा.
२. शरीरावरील रंग जास्त वेळ ठेवू नका नंतर हे रंग काढण्यासाठी खूप कसरत करावी लागेल.
३. शरीरावरील रंग  निघत नसतील  तर केरोसीन,पेट्रोल किंवा अन्य हानिकारक पदार्थांचा वापर रंग काढण्यासाठी करू नका.
४. क्लींजिंग मिल्क चा वापर- याचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा स्वच्छ करू शकता.
५. केसांचा स्पा  करून घ्या.