महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन चे संकेत-पुढील दोन दिवसात होणार निर्णय

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन चे संकेत-पुढील दोन दिवसात होणार निर्णय

राज्यात कडक लॉकडाऊन करणे बाबत आज सायंकाळी ५ वाजता राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी एक विशेष ऑनलाइन झूम बैठक आयोजित केली होती.या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव मुख्य सीताराम कुंटे, उपमख्यमंत्री मा.अजित पवार,आरोग्यमंत्री राजेश टोपे, डॉ तात्याराव लहाने, अशोक चव्हाण,विजय वडेट्टीवार,विरोधी पक्ष नेते मा.देवेंद्र फडवणीस,प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पुढील बाबी मांडल्या 
मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच लोकांचे जीव वाचवायचे असतील तर लॉक डाऊन शिवाय पर्याय नाही असे मत व्यक्त केले ,या साठी सर्व पक्षांनी निर्णय घेण्याची वेळ आली आहे असे मुख्यमंत्र्यानी आवाहन केले, ते पुढे बोलले कि सध्याची स्थिती आव्हानात्मक आहे यंत्रांचा शक्तिपात होऊ नये म्हणून 
लॉकडाऊन आवश्यक आहे.

मुख्यमंत्र्यांनी या गोष्टींचा प्रकर्षाने उल्लेख केला 


१.राज्यात सध्या पाच लाख ३४ हजार ॲक्टिव रुग्ण आहेत, हे असेच सुरु राहिले तर १५ ते २१ एप्रिल दरम्यान हि परिस्थिती गंभीर होईल.
२ .राज्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे,पुरवता नियंत्रित करण्यावर आम्ही भर देत आहोत.
३.रुग्ण वाढ थांबवायची असेल तर कोरोना ची साखळी तोडणे आवश्यक आहे,लॉकडाऊन लागू केल्यास एक महिन्याच्या आत रुग्ण वाढ नियंत्रणात येईल.
४.२५ पेक्षा कमी वय असणाऱ्याना देखील लस उपलब्ध करून देण्याची मागणी  मी मा.पंतप्रधान यांच्याकडे केली आहे.
५.घरातून काम करण्याचे नियोजन करा.


आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील राज्याच्या आरोग्य यंत्रणे विषयी माहिती दिली.


१.राज्याला सध्या  ५०,००० रेमडेसिव्हीर इंजेक्शन ची आवश्यकता आहे आणि येणाऱ्या  दिवसात हि गरज १ लाखाहून जास्त इंजेक्शन ची असू शकते.
२.रेमडेसिव्हीर इंजेक्शन ची गरज असणाऱ्या रुग्णांची वर्गवारी केली पाहिजे तसेच खाजगी हॉस्पिटल मधील .रेमडेसिव्हीर इंजेक्शन च्या विक्रीची परिपूर्ण माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक केले पाहिजे.
३.मुंबई -पुणे यासारख्या मोठ्या शहरात ट्रेसिंग करणे आरोग्य यंत्रणेला  खूप  अवघड जात आहे
४.राज्यात बऱ्याच शहरात आय सी यु बेड आणि वेंटीलेटर ची कमतरता आहेत.
५.सध्या दिवसाला पाच लाख व्हॅक्सिनेशन होत आहेत.

कॉग्रेसपक्षाची भूमिका- नाना पटोले  आणि बाळासाहेब थोरात


लोकांचा जीव वाचविणे आवश्यक आहे,मृत्यू थांबण्यासाठी कठोर निर्णय घ्या.पूर्ण लॉक डाऊन करण्या पेक्ष्या मध्य बिंदू काढा.सर्वसामान्यांचा विचार करून पूर्ण लॉक डाऊन निर्णय घ्यावा.


राष्ट्रवादी पक्षाची भूमिका-

या बैठकीच्या अगोदरच उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांनी असे सांगिलतेले होते कि संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घ्यावा लागेल तसेच महाराष्ट्राच्या हितासाठी मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्यासाबोत आम्ही राहू,आम्हाला महाराष्ट्र्रातील सामान्य जनता,मजूर,व्यवसायिक यांची काळजी आहे,सरकार कोणताही निर्णय घेताना त्यांचा विचार अवश्यकरेल.


विरोधी पक्षाची भूमिका-

राज्यात पूर्ण लॉक डाऊन करायचा असेल तर सामान्य जनतेला,व्यापारी याना पॅकेज जाहीर करा ( मा. देवेंद्र फडवणीस)
१.आरोग्य सुविधा तात्काळ उभ्या करा रिपोर्ट तात्काळ कसे मिळतील यासाठी यंत्रणा करणे गरजेचे आहे
२. rt-pcr चाचण्या वाढवा
३.रुग्णांना वेळेत रेमडेसिव्हीर इंजेक्शन,ऑक्सिजन आणि बेड उपलब्ध करून द्या
४. निर्बंध असायला हवेत पण जनतेचा,व्यापाऱ्यांच्या भावना समजून घ्या.
५. पूर्ण लॉक डाऊन करायचा असेल तर राज्याचे  कर्ज वाढले तरी वाढू द्या परंतु पॅकेज जाहीर करा.


प्रवीण दरेकर (विरोधी पक्षनेते)


१.प्रशासन उपलब्ध करून देत असलेल्या ऑक्सीजन,व्हेंटिलेटरची ची आकडेवारी द्या
२.काँग्रेसमध्ये एकमत नाही.
३.छोटे व्यावसायिक तसेच हातावर पोट असणाऱ्या ची सोय करा.
४.दुकान ते घर वस्तू पोचवता येतील (चेन)अशी व्यवस्था तयार करा.
५.व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.

राज ठाकरे यांच्या हातावर लीलावती हॉस्पिटल येथे  एक शस्त्रक्रिया  होणार होती,त्यामुळे आजच्या बैठकीत राज ठाकरे सहभागी होऊ शकले नाहीत

शेवटी आजच्या झूम मेटींग मध्ये लॉकडउन बाबत निर्णय होऊ शकला नाही परंतु राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांनी सांगितले कि तज्ज्ञांच्या मते कोरोना चेन तोडायची असेल तर किमान १४ दिवसाचा लोकडाऊन आवश्यक आहे या बाबतीत मी सहमत आहे लोकडाऊन बाबत पुढील दोन दिवसात योग्य तो निर्णय घेऊ.